महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सिम्पल एनर्जी ऑगस्टमध्ये करणार ई-स्कूटर लाँच; जाणून घ्या, वैशिष्ट्ये

सिंपल एनर्जी पहिल्यांदा बंगळुरूमध्ये लाँच होणार आहे. त्यानंतर ई-स्कूटर चेन्नई आणि हैदराबादमध्ये लाँच होणार आहे. कंपनीने इतर शहरांमधील बाजारपेठेतही ई-स्कूटर उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे.

सिम्पल एनर्जी
सिम्पल एनर्जी

By

Published : May 15, 2021, 8:19 PM IST

मुंबई - बंगळुरूस्थित इलेक्ट्रिक स्टार्टअप कंपनी सिंपल एनर्जीने शुक्रवारी पहिली ई-स्कूटर लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. या ई-स्कूटरचे कोडनेम मार्क २ आहे. ही ई-स्कूटर १५ ऑगस्टला लाँच होणार आहे.

सिंपल एनर्जी पहिल्यांदा बंगळुरूमध्ये लाँच होणार आहे. त्यानंतर ई-स्कूटर चेन्नई आणि हैदराबादमध्ये लाँच होणार आहे. कंपनीने इतर शहरांमधील बाजारपेठेतही ई-स्कूटर उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. कंपनीचा बंगळुरूमध्ये उत्पादन प्रकल्प आहे. तसेच संशोधन आणि विकास युनिटही आहे.

हेही वाचा-१.१ अब्ज वसुलीकरता एअर इंडियाविरोधात केअर्नची अमेरिकेच्या न्यायालयात धाव

ऑगस्टमध्ये ई-स्कूटर लाँच करण्याचे नियोजन

सिंपल एनर्जीचे संस्थापक आणि सीईओ सुहास राजकुमार म्हणाले, की ई-स्कूटरची लाँचिग तारीख जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. १५ ऑगस्ट हा देशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. भारतीय कंपनीकडून जागतिक दर्जाचे उत्पादन होताना इतिहास निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. जर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील परिस्थिती सुधारली तर ऑगस्टमध्ये ई-स्कूटर लाँच करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा-कोरोनाचा फटका; अक्षयतृतीयेला दरवर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्के सोन्याची विक्री

ई-स्कूटर लाँच झाल्यानंतर बुकिंग सुरू होणार

या ई-स्कूटरमध्ये ४.८ केडब्ल्यूएचची लिथीयम-आयॉन बॅटरी आहे. ही ई-स्कूटर इकोमोडमधून २४० किलोमीटर धावू शकते. तर गतीने प्रति तास १०० किलोमीटर धावू शकते. ई-स्कूटर लाँच झाल्यानंतर बुकिंग सुरू होणार आहे. या वाहनाची किंमत १.१० लाख ते १.२० लाख रुपये असणार आहे. तिसऱ्या तिमाहीत ११२ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्याचा कंपनी प्रयत्न करणार आहे. ई-स्कूटर लाँच होण्यापूर्वी बंगळुरूमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details