हैदराबाद- केंद्र सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी लागू केली असली तरी अनेक चिनी अॅप बंदीपासून सुटले आहेत. यामध्ये मुलांमध्ये गेमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या पब्जीसह अनेक अॅपचा समावेश आहे.
काही चिनी अॅप हे बंदीमधून सुटले आहेत. हे अॅप इतर अॅपप्रमाणे सुरक्षेला धोका नसल्याने त्यांच्यांवर बंदी लागू करण्यात आली नसावी, अशी शक्यता आहे. कदाचित अॅपचे सरकराकडून अजून अवलोकन करण्यात येत असावे. त्यांच्यावरही भविष्यात बंदी लागू करण्यात येवू शकते.
हे अॅपबंदीमधून सुटले आहेत.
- पब्जी मोबाईल
- एमव्ही मास्टर
- अली एक्सप्रेस
- टर्बो व्हीपीएन
- अप लॉक बाय डू मोबाईल
- रॉझ बज वूई मिडिया
- 360 सिक्युरिटी
- नोनो लाईव्ह
- गेम ऑफ सुलतानज
- माफिया सिटी
या कारणाने पब्जीची बंदीमधून झाली असावी सुटका
गुप्तचर विभागाने पब्जीपासून भविष्यात काय धोका होवू शकतो, याची माहिती घेतली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोका असलेल्या अॅपमध्ये पब्जीचा समावेश करण्यात आला नाही.
पब्जी हे संपूर्णपणे चिनी अॅप नाही. या अॅपचे व्यवस्थापन हे ब्ल्यूहोल या दक्षिण कोरियाच्या संस्थेकडून चालविले होते. चीनची बलाढ्य कंपनी टेनसेंट कंपनीने ब्ल्यूहोलबरोबर भागीदारी केल्यानंतर पब्जीची लोकप्रियता वाढली. टेनसेंट कंपनीने सुरुवातीला पब्जीचे चीनमधील वितरण आणि काम पाहण्यास सुरुवात केली होती. तर टेनसेंट होल्डिंगकडून भारतामध्ये पब्जीचे वितरण करण्यात येत आहे. या गेमची चिनशी लिंक असल्याचा दावा फेटाळता येवू शकणार नाही. मात्र, मालकी हे संमिश्र स्वरुपाची आहे. त्यामुळेच अॅपवरील बंदी टळण्याची शक्यता आहे.