नवी दिल्ली- कोरोनाच्या संकटात निर्णायक विजय ठरू शकणारी बातमी आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोनाच्या लसीचे उत्पादन पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट घेणार आहे. हे उत्पादन तीन आठवड्यात सुरू होणार आहे. तर मानवी चाचणी यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होणार आहे.
लसीच्या उत्पादनासाठी सिरमने ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर भागीदारी केली आहे. जगभरातील केवळ सात इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्डने लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला म्हणाले, की ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या डॉ. हिल यांच्यासमवेत आमची टीम जवळून काम करत आहे. पहिल्या सहा महिन्यात दर महिन्याला ५० लाख लसीचे उत्पादन घेण्यात येणार आहे. हे प्रमाण वाढून दर महिन्याला १ कोटी लसीचे उत्पादन घेण्याची क्षमता होईल, असा विश्वास आहे.