महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सीरम स्पूटनिकचे सप्टेंबरमध्ये करणार उत्पादन; पुण्यात तयार होणारी ठरणार तिसरी लस - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

स्पूटनिकच्या पहिल्या बॅचचे सप्टेंबरला उत्पादन होणे अपेक्षित असल्याचे आरडीआयएफने म्हटले आहे. सीरमने दरवर्षी 300 दशलक्ष डोसचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तं

Serum
सीरम

By

Published : Jul 13, 2021, 3:40 PM IST

नवी दिल्ली - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) देशात तिसऱ्या कोरोना लशीचे उत्पादन घेणार आहे. कंपनीकडून सप्टेंबरपासून स्पूटनिक लशीचे उत्पादन करण्यात येणार आहे. ही लस रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) उत्पादित केली आहे. यापूर्वी सीरमकडून कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सचे उत्पादन घेण्यात येत आहे.

स्पूटनिकच्या पहिल्या बॅचचे सप्टेंबरला उत्पादन होणे अपेक्षित असल्याचे आरडीआयएफने म्हटले आहे. सीरमने दरवर्षी 300 दशलक्ष डोसचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये गॅमॅलिया सेंटरमधील सेल आणि व्हेक्टरचे सॅम्पल यापूर्वीच सिरमला मिळाले आहेत. भारतीय औषधी महानियंत्रक महासंचालनालयाने (डीसीजीआय) सीरमला आयातीची परवानगी दिल्याचेही आरडीआयएफने म्हटले आहे.

हेही वाचा-काश्मीरच्या तरुणाने केली अनोखी मस्त्यशेती; आता अनेकांना देतोय रोजगार

सीरमने लस उत्पादनात 25 जूनला मैलाचा दगड गाठला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (सीरम) पुण्यातील उत्पादन प्रकल्पामधून कोरोना लस कोवोवॅक्सचे उत्पादन शुक्रवारपासून सुरू केले आहे. ही लस अमेरिकन जैवतंत्रज्ञान कंपनीने विकसित केली आहे.

हेही वाचा-पुण्यात बाकड्यावर चुंबन करण्यास विरोध, २ तरुणींकडून वृध्द महिलेस मारहाण

पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे

  • डॉ. रेड्डीजने सप्टेंबर २०२० मध्ये रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून स्पूटनिक व्हीची चाचणी घेण्यात येणार आहे.
  • स्पूटनकि व्ही ही लस विकसित करणाऱ्या गॅमेलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडिमिलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजीला भारतात 125 दशलक्ष लशीचे डोस देण्याची परवानगी मिळालेली आहे.
  • यापूर्वीच आरडीआयएफचे सीईओ किरील दमित्रिएव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत भारतामध्ये 50 दशलक्ष डोसचे उन्हाळ्यात उत्पादन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी आरडीआयएफने भारतामधील पाच औषधी कंपन्यांबरोबर करार केले आहेत.
  • स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
  • कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी फायझर, स्पूटनिक व्ही आणि मॉर्डना लसीचे प्रत्येकी दोन डोस घ्यावे लागतात. तर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे दोन डोस घ्यावे लागतात.

हेही वाचा-देशात पहिल्यांदा कोरोना झालेल्या महिलेला दुसऱ्यांदा लागण

'गमलेया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायेलॉजी'सोबत भागेदारी

सीरम संस्था या अगोदर कोविड लसची (Covishield) निर्मिती करत होती. त्याच संस्थेने आता रशियामध्ये निर्मिती करण्यात येणारी स्पुटनिक व्ही लस निर्मिती करण्याची परवानगी मिळवली आहे. यासाठी सीरमने औषध महानियंत्रक मंडळाकडे परवानगी मागीतली होती. सीरम ही संस्था पुणे येथील हडपसरमधील आपल्या संस्थेत ही स्पुटनिक व्ही या लसीची निर्मिती करणार आहे. तसेच, निर्मितीमध्ये मॉस्को येथील 'गमलेया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायेलॉजी' ही संस्था आणि सीरम हे लस निर्मितीचे सोबत काम करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details