महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सीरमकडून लशीच्या दरात 100 रुपयांनी कपात; राज्यांचे वाचणार कोट्यवधी रुपये - Adar Poonawalla on covishield price

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदार पुनावाला यांनी ट्विट करत कोव्हिशिल्डची किंमत कमी केल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी राज्यांनी लशींच्या दराबाबत केंद्राकडे तक्रार केली होती.

आदार पुनावाला
आदार पुनावाला

By

Published : Apr 28, 2021, 6:15 PM IST

नवी दिल्ली-लशींच्या दराबाबत विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे आक्षेप नोंदविल्यानंतर सीरमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्डची किंमत राज्यांसाठी 100 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे राज्यांना कोव्हिशिल्ड ही 400 रुपये ऐवजी 300 रुपयांना मिळणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदार पुनावाला यांनी ट्विट करत कोव्हिशिल्डची किंमत कमी केल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की दानशुरपणा दाखवित सीरमने राज्यांना असलेल्या लशींची किंमत 400 रुपयांवरून 300 रुपये केली आहे. ही किंमत कमी केल्याने राज्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लसीकरण होणे शक्य आहे. त्यामुळे अगणित लोकांचे जीव वाचू शकणार आहेत, असे आदार पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आदार पुनावाला यांचे ट्विट

हेही वाचा-कच्चा माल द्या, सीरमच्या पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना साकडे

असे आहेत लशींचे दर-

हैदराबादमधील भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिनची किंमत सरकारसाठी 600 रुपये प्रति डोस आणि खासगी रुग्णालयांसाठी 1,200 रुपये प्रति डोस आहे. तर पुण्यातील सीरमच्या लशीची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये आहे. मात्र, दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी केंद्र सरकारसाठी प्रति डोस 150 रुपये किंमत ठेवली आहे.

हेही वाचा-'कोव्हिशील्ड' हे नाव वापरण्यापासून 'सीरम'ला आता थांबवणे योग्य नाही - हायकोर्ट

केंद्राकडून लस कंपन्यांना किंमत कमी करण्याची सूचना-

केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला कोरोना लशीची किंमत कमी करण्याची सूचना केली आहे. संकटाच्या काळात लस कंपन्यांकडून नफेखोरी होत असल्याची विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत कोरोना लशीच्या किमतीबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून लशीच्या सुधारित किमती देण्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-लशीच्या किमती कमी करण्याची केंद्राकडून भारत बायोटेकसह सीरमला सूचना

विविध राज्यांचा कोरोना लशीच्या किंमतीबाबत आक्षेप

कोरोना लशीच्या किमतीमध्ये फरक नसल्याने विविध राज्यांनी केंद्र सरकारकडे आक्षेप नोंदविला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशा काळात नफेखोरी करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व भारतीयांसाठी कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

भीम आर्मीने केले होते सीरमबाहेर आंदोलन-

सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस ज्या देशांनी आपल्या येथून घेतली. त्या सर्वांना 3 डॉलर ते 5 डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याच देशात आणि पुण्यात तयार होणारी ही लस आपल्या सर्वांना जवळपास 8 डॉलर दराने घ्यावी लागत आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे? हे स्पष्टपणे दिसून येत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने जाहीर केलेल्या या दराचा भीम आर्मीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून याविरोधात सीरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर आंदोलन करण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने भारत बायोटेकसाठी 1500 कोटी रुपये तर सीरमसाठी 3 हजार कोटी रुपये लस उत्पादनासाठी मंजूर केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details