नवी दिल्ली - अनेकदा विमानांची उड्डाणे रखडली जातात. अशावेळी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विमानतळावर स्वतंत्र प्रतिक्षागृह बांधण्यात येणार आहेत. हा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे.
हवामानातील धुक्यामुळे काहीवेळा विमान उड्डाणांना उशीर होतो. तर प्रतिकूल हवामानामुळे विमानांना नियोजित हवाई मार्गही बदलावा लागतो. अशावेळी विमानतळांवर प्रवासी अडकून राहतात. त्यामुळे अभ्यागत व प्रवाशांसाठी विमानतळावर प्रतिक्षागृहे सुरू करण्यात येणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) ही माहिती देणारे ट्विट केले आहे.