महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

निवडणुकीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात  सकारात्मक सुरुवात; निर्देशांकात २५० अंशाची वाढ

शुक्रवारी विदेशी वित्तीय गुंतवणूकदारांनी १ हजार ९५ कोटींच्या शेअरची खरेदी केली होती. तर देशातील वित्तीय संस्थांनी ४७०.७० कोटींच्या शेअरची विक्री केली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Mar 11, 2019, 12:53 PM IST

मुंबई - रविवारी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. आज शेअर बाजाराची सुरुवात होताच निर्देशांकात २५० अंशाची वाढ झाली. बँकिंग आणि ऑईल कंपन्यांचे शेअर वधारले.

आज शेअर बाजार खुला होताच निर्देशांक ३६,७४१ अंशावर पोहोचला. शुक्रवारी शेअर बाजार ३६,६७१ अंशावर बंद झाला होता. निफ्टीचीही सुरुवात ११,०६८ अंशावर झाली. शुक्रवारी निफ्टी ११,०३५ अंशावर बंद झाला होता. शुक्रवारी विदेशी वित्तीय गुंतवणूकदारांनी १ हजार ९५ कोटींच्या शेअरची खरेदी केली होती. तर देशातील वित्तीय संस्थांनी ४७०.७० कोटींच्या शेअरची विक्री केली होती.

कच्च्या तेलाच्या किंमती सोमवारी वाढल्याचे अँजेल ब्रोकिंगचे अनुज गुप्ता यांनी सांगितले. सौदी अरेबियाच्या मंत्र्यांनी ओपेक राष्ट्राकडून तेल पुरवठ्यात जूनपर्यंत कपात सुरुच ठेवणार असल्याचे जाहीर केले. यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.


ABOUT THE AUTHOR

...view details