मुंबई- विदेशी गुंतवणुकदारांनी निधी काढून घेतल्याने व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. आयटीसी, भारती एअरटेल, हिरो मोटोकॉर्प आणि अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम; शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण - Sameet Chavhan
सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक ५४.०६ अंशाने घसरून ३७,८२८.७३ वर पोहोचला. तर निफ्टी ३९.५० अंशाने घसरून ११,२४४.८० वर पोहोचला.

संग्रहित - शेअर बाजार
सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक ५४.०६ अंशाने घसरून ३७,८२८.७३ वर पोहोचला. तर निफ्टी ३९.५० अंशाने घसरून ११,२४४.८० वर पोहोचला. केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलैला सादर केल्यानंतर शेअर बाजारात नकारात्मक पडसाद उमटत असल्याचे एंजेल ब्रोकिंगचे समित चव्हाण यांनी सांगितले. शेअरची घसरण असली तरी ही संधी घेण्याची चांगली वेळ असल्याचे चव्हाण यांनी मत व्यक्त केले.