मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ३०० अंशांनी वधारला आहे. एचडीएफसी ट्विन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर वधारले आहेत. महागाईची आकडेवारी आणि कारखान्यातील उत्पादनांची आकडेवारी जाहीर होणार आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३३१.०४ अंशांनी वधारून ४१,५४७.१८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ९३.५० अंशांनी वधारून १२,२०१.४० वर पोहोचला.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी २०९.३९ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३४४.६३ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.