नवी दिल्ली – गुगलकडून वापरकर्त्यांची गरज लक्षात घेवून नेहमीच नवीन सुविधा सुरू करण्यात येतात. अशीच सेवा गुगल असिस्टंटमधून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वापरकर्त्याला केवळ बोलून ध्वनी संदेश (ऑडिओ मेसेज) पाठविणे शक्य होणार आहे.
गुगल असिस्टंटचे 'हे' आहेत नवीन उपयोग; अँड्राईड फोनवरून वापरता येणार - Uses of Google Assistant
गुगल असिस्टंट हे विविध पद्धतीने वापरकर्त्याला मदत करू शकणार आहे. मित्रांना फोनमधून लेख, फोटोही गुगल असिस्टंटच्या मदतीने पाठविणे शक्य होणार आहे.
![गुगल असिस्टंटचे 'हे' आहेत नवीन उपयोग; अँड्राईड फोनवरून वापरता येणार new feature of Google Assistant](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8480152-886-8480152-1597845276709.jpg)
गुगलअसिस्टंट हे इंग्रजीसह पोर्तुगीज भाषेत उपलब्ध आहे. गुगल असिस्टंटच्या मदतीने लेखदेखील वापरकर्त्याला ऐकता येणार आहेत. जेव्हा अँड्राईड फोनमध्ये वेबसाईटवर लेख दिसतो, तेव्हा ऐकण्यासाठी, 'हाय गुगल, रिड धिस पेज' असे वापरकर्त्याला म्हणावे लागणार आहे. त्यानंतर तो लेख गुगल असिस्टंट वाचून दाखविणार आहे.
गुगल असिस्टंट हे विविध पद्धतीने वापरकर्त्याला मदत करू शकणार आहे. मित्रांना फोनमधून लेख, फोटोही गुगल असिस्टंटच्या मदतीने पाठविणे शक्य होणार आहे. गुगल असिस्टंटला सूचना देवून सेल्फी काढणे, रेस्टॉरंट शोधणे, मित्रांना कंटेन्ट पाठविणे हे उपयोगही करता येणार आहेत.