नवी दिल्ली -न्यायालय अवमान प्रकरणात फेरविचार करण्याची विजय मल्ल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. न्यायालयाने आदेश देवूनही मल्ल्याने २०१७ मध्ये मुलांच्या बँक खात्यावर ४० दशलक्ष डॉलर पाठविले होते. या प्रकरणात न्यायालयाने विजय मल्ल्याला दोषी ठरविले होते.
विजय मल्ल्याच्या फेरविचार याचिकेचा यादीत का समावेश केला नाही, याची विचारणा करत त्याबाबतची सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रीकडून जूनमध्ये मागविली होती. गेली तीन वर्षे फेरविचार याचिकेची फाईल कोणत्या अधिकाऱ्यांनी हाताळली याची माहिती देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालायने रजिस्ट्रीला दिले आहेत.