नवी दिल्ली - कर्जफेडीच्या मुदतवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारनेदाखल केलेल्या प्रतिज्ञाबाबत सर्वोच्च न्यायालयात असमाधान व्यक्त केले आहे. कर्जफेडीला मुदतवाढ आणि 2 कोटीपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ माफ करण्याबाबत आठवडाभरात विस्तृत म्हणणे मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आरबीआय व केंद्र सरकारला दिले आहेत.
कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ मिळावी व चक्रवाढ व्याज माफ व्हावे, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायलयाने केंद्र सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दोन कोटी रुपयांपर्यंतचे चक्रवाढ व्याज (व्याजावरील व्याज) माफ करण्याची तयारी असल्याचे प्रतिज्ञापत्रातून सांगितले. मात्र, इतर अनेक मुद्द्यांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याचे निरीक्षण तीन सदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश अशोक भूषण यांनी नोंदविले.