महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी एसबीआय देशभर घेणार 'कस्टमर मीट' - omni

बँकेचा ग्राहकांवरील विश्वास वाढविणे आणि त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचणे हा कस्टमर मीटचा उद्देश्य असल्याचे बँकेचे एमडी (रिटेल आणि डिजीटल) पी.के.गुप्ता यांनी सांगितले.

एसबीआय

By

Published : May 24, 2019, 6:54 PM IST


मुंबई -देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या विविध तक्रारी जाणून घेण्यासाठी मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. देशातील १७ स्थानिक मुख्य कार्यालयांतर्गत ५०० ठिकाणी कस्टमर मीटचे आयोजन करण्यात आले आहे. हे कस्टमर मीटचे आयोजन २८ मे रोजी होणार आहे.

बँकेचा ग्राहकांवरील विश्वास वाढविणे आणि त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचणे हा कस्टमर मीटचा उद्देश्य असल्याचे बँकेचे एमडी (रिटेल आणि डिजीटल) पी.के.गुप्ता यांनी सांगितले.

मेगा कस्टमर मिटमध्ये अधिकाधिक ग्राहक येतील, अशी अपेक्षा आहे. यामधून आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेणार आहोत, त्यानंतर बँक शाखांमधून सेवा वाढविणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले. एसबीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी ग्राहक भेट कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत. त्यावेळी ग्राहक त्यांच्या अडचणीबाबत बँकेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करू शकणार आहेत. तसेच ग्राहक हे बँकेच्या सेवेबाबतचा प्रतिसाद अथवा सूचना देवू शकतात. यावेळी एसबीआच्या योनो एसबीआय आणि ओम्नी डिजीटल बँकिंग आणि लाईफस्टाईल माध्यमाची माहितीदेखील ग्राहकांना दिली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details