महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

तिसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेच्या नफ्यामध्ये ७ टक्क्यांची घसरण

स्टेट बँक ऑफ इंडियाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात किंचित घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेला एकूण ७५,९८०.६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर मागील आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत ७६.७९७.९१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया

By

Published : Feb 4, 2021, 3:48 PM IST

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. स्टेट बँकेला चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ५,१९६.२२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर गतवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत ५,५८३.३६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

स्टेट बँक ऑफ इंडियाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात किंचित घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेला एकूण ७५,९८०.६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर मागील आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत ७६.७९७.९१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

हेही वाचा-आरबीआयचा दणका; सेवा विकास सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड

  • आर्थिक कामगिरीची आकडेवारी पाहता मागील तिमाहीत बँकेच्या नफ्यात ५.८ टक्क्यांची घसरण झाली आहे.
  • बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत अंशत: सुधारणा झाली आहे. तर सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे घसरून डिसेंबरमध्ये ४.७७ टक्के झाले आहे.
  • मागील आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे ६.९४ टक्के झाले आहे. सकल बुडित कर्जाचे प्रमाण डिसेंबर २०२० अखेरपर्यंत १,१७,२४४.२३ कोटी रुपये राहिले आहे. तर डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत सकल बुडित कर्जाचे प्रमाण हे १,५९,६६१.१९ कोटी रुपये राहिले आहे.
  • बुडित कर्जांचे प्रमाण डिसेंबरच्या तिमाहीत १.२३ टक्क्यांनी घसरले आहे.

दरम्यान, मुंबई शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरची किंमत २.०२ टक्क्यांनी वाढून प्रति शेअर ३४२.६५ रुपये राहिले आहे.

हेही वाचा-टेक महिंद्रा चालू वर्षात ५ हजार जणांना सेवेत घेणार

स्टेट बँक देशात करणार विस्तार-

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक देशात विस्तार करणार आहे. त्यासाठी सीएमएस इन्फो सिस्टिम्स स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३ हजार एटीएम मार्चपर्यंत सुरू करणार आहे. स्टेट बँकेच्या एटीएमचे काम हे सीएमएस कंपनीकडून चालविण्यात येते. सीएमएसला ३ हजार एटीएम सुरू करण्याची परवानगी मिळाल्याचे कंपनीचे अध्यक्ष मंजुनाथ राव यांनी सांगितले. त्यामुळे सीएमएसकडे एकूण ५ हजार एटीएएम असणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details