महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'स्टेट बँके'चे गृहकर्जासह वाहनकर्ज स्वस्त; सलग आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात - एसबीआय वाहनकर्ज

फंडसाठी खर्च कमी लागणार आहे. याचा फायदा ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी एमसीएलआरमध्ये १० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसबीआयने म्हटले आहे.

State Bank of India
स्टेट बँक ऑफ इंडिया

By

Published : Dec 9, 2019, 2:53 PM IST

मुंबई- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आज एमसीएलआरमध्ये १० बेसिस पाँईटने कपात केली आहे. या कपातीने एमसीएलआरशी संलग्न असलेले गृह कर्ज, वाहन कर्जासह इतर कर्ज स्वस्त होणार आहे.

एसबीआयने चालू आर्थिक वर्षात सलग आठव्यांदा एमसीएलआरच्या दरात कपात केली आहे. फंडसाठी खर्च कमी लागणार आहे. याचा फायदा ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी एमसीएलआरमध्ये १० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसबीआयने म्हटले आहे.

हेही वाचा-नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला

भारतीय रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणात ५.१५ टक्के हा रेपो दर 'जैसे थे' ठेवला आहे.

जाणून घ्या, काय आहे एमसीएलआर-
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (एमसीएलआर) ही भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली पद्धत आहे. याचा वापर करून वाणिज्य बँकांकडून देण्यात येणारे कर्जाचे व्याज ठरविले जातात. याचा वापर बँकांकडून नोटाबंदीनंतर सुरू करण्यात आला. एमसीएलआरच्या अंमलबजावणीच्या ग्राहकांना फायदा होतो. कारण आरबीआयकडून रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतात.

हेही वाचा-मारुती सुझुकीचे २.१९ टक्क्यांनी वधारले शेअर; व्होडाफोन आयडियाला ५. ६ टक्क्यांचा फटका

ABOUT THE AUTHOR

...view details