महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्टेट बँकेचे कर्ज स्वस्त; सलग चौदाव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात

स्टेट बँकेने सलग 14व्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. स्टेट बँकेच्या कर्जाचे सर्वात कमी व्याजदर आहेत.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 8, 2020, 2:18 PM IST

मुंबई – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने एमसीएलआरमध्ये 5-10 बेसिस पाँईटने कपात केली आहे. त्यामुळे कमी कालावधीच्या कर्जाचे व्याजदर कमी होणार आहेत. हे नवीन कर्जाचे व्याजदर 10 जुलैपासून लागू होणार आहेत.

स्टेट बँकेने तीन महिन्यांच्या कालावधीच्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. त्यामागे वित्तीय बाजारपेठेत अधिक चलनाचा पुरवठा व्हावा व मागणीला चालना मिळावी, हा हेतू असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. या कपातीने एमसीएलआरशी संलग्न असलेले वाहन कर्जासह इतर कर्ज स्वस्त होणार आहे.

तीन महिन्यांच्या कर्जाचा व्याजदर हा वार्षिक 6.65 टक्के असणार आहे. स्टेट बँकेने सलग 14व्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. स्टेट बँकेचे सर्वात कमी व्याजदर आहेत.

जाणून घ्या, काय आहे एमसीएलआर-
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (एमसीएलआर) ही भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली पद्धत आहे. याचा वापर करून वाणिज्य बँकांकडून देण्यात येणारे कर्जाचे व्याज ठरविले जातात. याचा वापर बँकांकडून नोटाबंदीनंतर सुरू करण्यात आला. एमसीएलआरच्या अंमलबजावणीच्या ग्राहकांना फायदा होतो. कारण आरबीआयकडून रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतात.

ABOUT THE AUTHOR

...view details