महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्टेट बँकेचा ठेवीदारांना धक्का; 'या' मुदतठेवीच्या व्याजदरात होणार कपात - fixed deposits of FD rates

स्टेट बँकेने मुदत ठेवीवरील कमी केलेला व्याजदर हा १० जानेवारीपासून लागू करण्यात आलेला आहे.

SBI
स्टेट बँक ऑफ इंडिया

By

Published : Jan 14, 2020, 8:20 PM IST


मुंबई -देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ठेवीदारांना धक्का दिला आहे. दीर्घकाळ मुदतीच्या ठेवीवरील व्याजदरात स्टेट बँकेने १५ बेसिस पाँईटची कपात केली आहे.


स्टेट बँकेने मुदत ठेवीवरील कमी केलेला व्याजदर हा १० जानेवारीपासून लागू करण्यात आलेला आहे. ज्या ठेवीदारांनी बँकेत १ वर्ष ते १० वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी ठेवी ठेवल्या आहेत, त्यांना या व्याजदरातील कपातीचा फटका बसणार आहे. ज्या बँक ग्राहकांनी सात दिवस ते १ वर्षाच्या मुदतीकरता ठेवी ठेवल्या आहेत, त्यांच्यासाठी व्याजदर जैसे थे राहणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने एक वर्ष ते २ वर्षांच्या कालावधीच्या ठेवीसाठीचा व्याजदर हा १५ बेसिस पाईंटने नोव्हेंबरमध्ये कमी केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details