नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक मंडळाने (ईसीसीबी) येस बँकेचे ७२५ कोटी शेअर खरेदी करण्याला मंजुरी दिली आहे. येस बँकेच्या प्रति शेअरची किंमत १० रुपये आहे. त्यामुळे स्टेट बँकेला ७,२५० कोटी रुपये येस बँकेला द्यावे लागणार आहेत.
एसबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या कार्यकारी समितीची बैठक ११ मार्चला २०२० ला झाली. यामध्ये येस बँकेचे शेअर खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. या शेअर खरेदीनंतर स्टेट बँकेचा येस बँकेमध्ये ४९ टक्क्यापर्यंत हिस्सा राहणार आहे.