नवी दिल्ली - सॅमसंगने या वर्षाच्या तिसर्या तिमाहीत देशात चांगली कमाई केली आहे. कंपनीने भारतासह काही प्रमुख बाजारात 8.8 कोटी हँडसेटची विक्री केली आहे. यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे, तर 90 दशलक्ष टॅब्लेटची विक्री झाली आहे. गुरुवारी कंपनीने ही माहिती दिली.
काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, स्मार्टफोनच्या बाजारपेठेत शाओमीवर आपले वर्चस्व परत मिळविण्यासाठी सॅमसंगला दोन वर्षे लागली. वर्षाच्या तिसर्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर या कालावधीत) 24 टक्के वाटा असलेल्या सॅमसंगने शाओमीला मागे टाकत प्रथम स्थान मिळविले. यावेळी शाओमीने 23 टक्के वाटा घेऊन दुसरे स्थान मिळविले आहे.
हेही वाचा -रियलमीचे क्यू 2 मालिकेतील 3 नवीन 5जी स्मार्टफोन बाजारात