नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात आणि अर्थव्यवस्थेत घसरण होताना रोजगाराबाबत दिलासादायक बातमी आहे. कॅलिफॉर्नियाची आयटी कंपनी सेल्सफोर्सने देशात प्रत्यक्ष ५.४८ लाख नोकऱ्या देण्याचे नियोजन केले आहे. येत्या काळात जीडीपीत जगात दुसरा क्रमांक मिळविण्याची भारताची क्षमता असल्याचेही सेल्सफोर्सचे चिफ डाटा एवेजेलिस्ट वाला अफसर यांनी म्हटले आहे. ते 'रेज समिट' मध्ये ऑनलाईन माध्यमातून बोलत होते.
'ही' कंपनी देशात ५.४८ लाख नोकऱ्या देण्याचे करणार नियोजन
कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या अर्थव्यवस्थेत डाटा हे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे भारतात कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात महाशक्ती होण्याची क्षमता आहे.
सेल्सफोर्सचे चिफ डाटा एवेजेलिस्ट वाला अफसर म्हणाले, की देशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १३ लाख नोकऱ्या देण्याचे कंपनीचे नियोजन आहे. सेल्स फोर्सचे २४० अब्ज डॉलरचे भांडवली मूल्य होईल, असा अंदाज अफसर यांनी व्यक्त केला. अफसर पुढे म्हणाले, की आम्ही २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करणार आहोत. भारत लवकरच जगात सर्वाधिक जोडलेला समाज (कनेक्टेड सोसायटी) होणार आहे.
कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या अर्थव्यवस्थेत डाटा हे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे भारतात कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात महाशक्ती होण्याची क्षमता आहे. देशामधील ६० कोटी लोक इंटरनेटशी जोडलेले आहेत. त्यामुळे ग्राहक येत्या पाच ते सहा वर्षात ६ लाख कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येत ८० टक्के लोकांचे वय हे ४४ वर्षांहून कमी आहे. त्यामुळे इंटरनेटला जोडलेला सर्वात प्रगत समाज भारतात असणार आहे.