नवी दिल्ली - टॅक्सी अॅग्रीगेटर असलेल्या ओला व उबेरकडून आकारण्यात येणाऱ्यावर भाड्यावर नियंत्रण आणा, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. स्वदेशी जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे. या संघटनेचे अध्यक्ष अश्विनी महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांना पत्र लिहिले आहे
स्वदेशी जागरण मंच संघटनेचे अध्यक्ष अश्वनी महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ओला व उबेरची कमी दरातील सेवा २०१४-१५ पासून सुरू झाल्याचे म्हटले आहे. मुंबईमध्ये ६ मिनिटांच्या प्रवासासाठी २ हजार रुपये आकारल्याचा स्क्रीनशॉट मिळाला आहे. हा धक्कायदायक प्रकार असून या प्लॅटफॉर्ममधून जास्त भाडे आकारण्यात येत असल्याकडे स्वदेशी जागरण मंचने लक्ष वेधले आहे.
हेही वाचा-'अॅमेझॉनसह फ्लिपकार्टच्या मोठ्या ऑफर बंद करा, अन्यथा न्यायालयात जावू'