चेन्नई - देशात इंधनाचे दर वाढत आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाने इंधनासाठी पर्याय म्हणून लिथियमन बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी हायड्रोजन सेल अशा पर्यायावर काम सुरू केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, माझी सूचना आहे की, देशाने पर्यायी इंधनाचा स्वीकार करण्याची हीच वेळ आहे. यापूर्वीच वीजनिर्मितीचे प्रमाण अधिक असताना वीजेचा वापर इंधन करण्यासाठी मी प्रोत्साहन दिले आहे. सध्या देशात ८१ टक्के लिथियम-आयन बॅटरी देशात तयार केल्या जात आहेत. हायड्रोजन इंधन तयार करण्यासाठी मंत्रालय काम करत आहे. जीवाश्म इंधनाला पर्याय देणे हे देशासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. त्यावर आम्ही काम करत आहोत.
हेही वाचा-रेलटेलच्या भागविक्रीत पहिल्याच दिवशी २.६४ पटीने अधिक अर्जभरणा
७० टक्के जीवाश्म इंधन आयात करणे ही समस्या-
सध्या, देशात ८ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करण्यात येते. जगात जीवाश्म इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. तर भारत ७० टक्के जीवाश्म इंधन आयात करतो, ही समस्या आहे. नुकतेच जैव-सीएनजीवर चालणारे ट्रॅक्टर लाँच केले आहे. त्यासाठी लागणारे इंधन हे जैविघ घटकांपासून तयार करण्यात येते. शेतामधून इंधन तयार करण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे, अशी माझी राज्य सरकारांना विनंती आहे. त्यामधून शेतकऱ्यांना महसूल मिळविण्याची संधी द्यावी, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या महगाईचा 'भडका' थांबेना...सलग आठव्या दिवशी दरवाढ
देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने गाठला 'कळस'
पेट्रोल आणि डिझेलचे दर २०२१ मध्ये २१ वेळा वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीने पेट्रोल २०२१ मध्ये प्रति लिटर ५.५८ रुपयांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटर ५.८३ रुपयांनी महागले आहे. देशातील बहुतेक महानगरे आणि शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे.