नवी दिल्ली - निवडणुकीच्या तोंडावर सरकारची चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे. किरकोळ बाजारपेठांमधील महागाईचा निर्देशांक फेब्रुवारीत २.५७ टक्के झाला आहे. महागाईचा हा निर्देशांक गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक आहे.
किरकोळ महागाईचा निर्देशांक फेब्रुवारीत २.५७ टक्के, गेल्या चार महिन्यातील गाठला उच्चांक - महागाई
महागाईचा निर्देशांक हा ग्राहक दर निर्देशांकावर (सीपीआय) आधारित आहे. हा ग्राहक दर निर्देशांक जानेवारीत १.९७ टक्के तर फेब्रुवारी २०१८ मध्ये ४.४४ टक्के राहिला आहे.
संपादित
महागाईचा निर्देशांक हा ग्राहक दर निर्देशांकावर (सीपीआय) आधारित आहे. हा ग्राहक दर निर्देशांक जानेवारीत १.९७ टक्के तर फेब्रुवारी २०१८ मध्ये ४.४४ टक्के राहिला आहे. अन्नाच्या किंमती मात्र ०.६६ टक्क्याने घसरल्या आहेत. किरकोळ महागाईचा निर्देशांक विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक ही पतधोरण निश्चित करत असते. आरबीआयने महागाईचा निर्देशांक ४ टक्के निश्चित केला आहे. त्या तुलनेत महागाईचा दर प्रत्यक्षात कमी आहे.