महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्रीय अर्थमंत्र्यांशी रेस्टॉरंट संघटनेची चर्चा; मदतीची केली मागणी

एनआरएआयसोबतच्या बैठकीला केंद्रीय आर्थिक सचिव तरुण बजाज आणि महसूल सचिव अजय भूषण पांडे हे उपस्थित होते. तर एनआरएआयचे अध्यक्ष अनुराग कटियार हे उपस्थित होते.

संग्रहित
संग्रहित

By

Published : May 22, 2020, 9:01 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे देशातील रेस्टॉरंट उद्योगाला मोठा फटका बसला आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एनआरएआय) प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी व्हिडिओद्वारे संवाद केला. यावेळी संघटनने धोरणात्मक आणि चलनाच्या तरलेतमधून मदत करण्याची अर्थमंत्र्यांना विनंती केली.

एनआरएआयसोबतच्या बैठकीला केंद्रीय आर्थिक सचिव तरुण बजाज आणि महसूल सचिव अजय भूषण पांडे हे उपस्थित होते. तर एनआरएआयचे अध्यक्ष अनुराग कटियार हे उपस्थित होते.

हेही वाचा-कोरोनाच्या संकटात आणखी आर्थिक पॅकेज देण्याचे अनुराग ठाकूर यांचे संकेत

या संघटनेने केल्या आहेत मागण्या-

  • रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना ईएसआयसीमधून मदत करण्यात यावी.
  • कमीत कमी व्याजदरात खेळते भांडवल तातडीने उपलब्ध करून द्यावे.
  • कर्ज भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी.
  • ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सवलतींवर मर्यादा घालण्यात यावी.

हेही वाचा-पीपीईचे उत्पादन न घेणाऱ्या भारताने दोन महिन्यात 'हा' मिळविला क्रमांक

दरम्यान, देशात २५ मार्चपासून टाळेबंदी असल्याने रेस्टॉरंट, हॉटेलसह अनेक उद्योग बंद आहेत. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details