नवी दिल्ली- येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यामधून केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. येस बँकेवरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात येणार असून, ३ एप्रिलपर्यंत ते लागू असणार आहेत. तसेच, या ३० दिवसांसाठी येस बँकेचे संचालक मंडळही निलंबित करण्यात आले आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची बँकेच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे.