चेन्नई - रेनॉल्ट-निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरएनएआयपीएल) ने आपल्या नवीन कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) निसान मॅग्नाईटचे उत्पादन सुरू केले आहे.
आरएनएआयपीएलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बिजू बालेंद्रन यांनी ही माहिती दिली. बिजू यांच्या म्हणण्यानुसार, आरएनएआयपीएलची नवीन एसयूव्ही संपूर्णपणे जपानी तंत्रज्ञानाने भारताची गरज लक्षात ठेवून आणि मानवी केंद्रीत अभियांत्रिकीद्वारे तयार केली गेली आहे.
हेही वाचा -ऑक्टोबरमध्ये टीव्हीएस मोटरच्या विक्रीत 22 टक्क्यांनी वाढ