महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्राकडून राज्यांना होणारा रेमडेसिवीरचा पुरवठा थांबणार - केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय

११ एप्रिल २०२१ पासून रेमडेसिवीरचे उत्पादन हे देशात दहापटीने वाढले आहे. ११ एप्रिल २०२१ पर्यंत ३३ हजार इंजेक्शनचे रोज उत्पादन घेण्यात येते होते. हे प्रमाण वाढवून ३,५०,००० रेमडेसिवीरचे रोज उत्पादन होत असल्याचे केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी सांगितले.

रेमडेसिवीर
रेमडेसिवीर

By

Published : May 29, 2021, 6:52 PM IST

नवी दिल्ली - कोरोनावरील उपचारात वापरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख एल. मांडवीय यांनी दिली आहे.

केंद्रीय रसायन मंत्री मनसुख एल. मांडवीय यांनी ट्विट करत रेमडेसिवीरच्या इंजेक्शनबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. मागणीच्या तुलनेत रेमडेसिवीरचा देशात खूप पुरवठा होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांसाठी रेमडेसिवीरची तरतूद थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-ट्विटरकडून ब्ल्यू बॅजची पडताळणी बंद; पुन्हा प्रक्रिया करणार सुरू

एका महिन्यांत इंजेक्शनच्या उत्पादनात दहापटींची वाढ

११ एप्रिल २०२१ पासून रेमडेसिवीरचे उत्पादन हे देशात दहापटीने वाढले आहे. ११ एप्रिल २०२१ पर्यंत ३३ हजार इंजेक्शनचे रोज उत्पादन घेण्यात येते होते. हे प्रमाण वाढवून ३,५०,००० रेमडेसिवीरचे रोज उत्पादन होत असल्याचे केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी सांगितले. केंद्र सरकारने देशातील रेमडेसिवीरच्या प्रकल्पांची संख्या महिनाभरात २० प्रकल्पावरून ६० प्रकल्पापर्यंत केली आहे. केंद्र सरकारने रेमडेसिवीरचे ५० लाख अतिरिक्त इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा साठा आपत्कालीन आवश्यकतेसाठी रणनीतीचा भाग म्हणून खरेदी करण्यात येणार आहे.

हेही वाचा-मुंबई पेट्रोलच्या दराने ओलांडले शतक; सामान्यांच्या खिशाला कात्री

रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी केंद्राकडून उपाययोजना

  • देशात रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा ठेवण्यासाठी देखरेख ठेवण्याचे आदेश दिल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
  • रेमडेसिवीरच्या पुरवठ्यात वाढ होण्यासाठी यापूर्वीच केंद्राने रेमडेसिवीर, त्याचा कच्चा माल आणि घटक पदार्थांवरील सीमा शुल्क माफ माफ केले आहे.
  • केंद्र सरकारने ११ एप्रिलला रेमडेसिवीर आणि औषधी घटक द्रव्यांवर (एपीआयएस) निर्यातीवर बंदी लागू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details