महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दिलासादायक! रिलायन्स रोज १ लाख मास्कचे करणार उत्पादन

कोरोनाच्या संकटाने काम बंद झाले तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येणार आहे. तर कोरोनाचे रुग्ण घेवून जाणाऱ्या वाहनांना मोफत इंधन देण्यात येणार आहे. तसेच विविध शहरात उदरनिर्वाहावर परिणाम झालेल्या व्यक्तींना मोफत अन्न वितरित करण्यात येणार असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.

मास्क
मास्क

By

Published : Mar 23, 2020, 5:56 PM IST

नवी दिल्ली - महामारी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने मास्कची निर्मिती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स रोज १ लाख मास्कची निर्मिती करणार आहे.

कोरोनाच्या संकटाने काम बंद झाले तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येणार आहे. तर कोरोनाचे रुग्ण घेवून जाणाऱ्या वाहनांना मोफत इंधन देण्यात येणार आहेत. तसेच विविध शहरात उदरनिर्वाहावर परिणाम झालेल्या व्यक्तींना मोफत अन्न वितरित करण्यात येणार असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून १०० बेडचे रुग्णालय नवी दिल्लीत चालविले जाते.

हेही वाचा-कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाही शेअर बाजार सुरू : गुंतवणूकदारांना 'ही' आहे भीती

दरम्यान, वेदांत कंपनीने कोरोना विरोधात लढण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details