महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'येस बँक' प्रकरणी अनिल अंबानींना 'ईडी'कडून समन्स!

येस बँक प्रकरणी बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांची 'ईडी'मार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच अनिल अंबानी यांना ईडी कडून चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे.

Reliance Group Chairman Anil Ambani summoned by ED
'येस बँक' प्रकरणी अनिल अंबानींना 'ईडी'कडून समन्स!

By

Published : Mar 16, 2020, 11:16 AM IST

मुंबई - येस बँक प्रकरणी बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांची 'ईडी'मार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच अनिल अंबानी यांना ईडी कडून चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे. सोमवारी या प्रकरणी अनिल अंबानी यांना ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अनिल अंबानी यांनी पुढील तारखेची मागणी केल्याचे ईडी सूत्रांकडून कळत आहे.

ईडी कडून 'मनी लाँड्रिंग'च्या संदर्भात राणा कपूर यांची चौकशी सुरू आहे. अनिल अंबानी यांनी येस बँकेकडून तब्बल 12 हजार 800 कोटींच कर्ज घेतले आहे. जे अद्याप भरण्यात आलेले नाही. येस बँकेचे मोठे कर्जदार म्हणून अनिल अंबानी ग्रुप, एस्सेल ग्रुप, व्होडाफोन, आयएलएफएस, डिएचएफएल यांसारख्या कंपन्यांनी मोठे कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड होण्यास विलंब होत आहे. ईडी कडून या सर्व कंपन्यांच्या प्रमुखांना चौकशी साठी समन्स बाजविण्यात येत आहेत. यातच आता अनिल अंबानींनाही समन्स बजावण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details