नवी दिल्ली - यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात ३३० लाख हेक्टर क्षेत्राहून अधिक क्षेत्रावर गव्हाची लागड करण्यात आली आहे. पीक लागवडीसाठी अनुकूल हवामान असल्याने गव्हाची लागवड वाढली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या हंगामात कडधान्ये, हरभरा आणि तेलबियांच्या लागवडीचे प्रमाण वाढले आहे. ही आकडेवारी केंद्रीय कृषी आणि कृषीकल्याण विभागाने जाहीर केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाची लागवड ही ११.१८ टक्क्यांनी अधिक झाली आहे.
हेही वाचा-मारुतीने बीएस-६ इंजिन क्षमतेच्या 'या' मॉडेलचे केले लाँचिंग
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हिट आणि बार्ली रिसर्चचे (आयआयडब्ल्यूबीआर) संचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग म्हणाले, गव्हाच्या लागवडीसाठी सध्याचे हवामान अनुकूल आहे. हे हवामान अनुकूलच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंडियन पल्सेस रिसर्च इन्स्टिट्यूटचे (कानपूर) शास्त्रज्ञ जी. पी. दिक्षीत म्हणाले, अतिवृष्टीमुळे खरीपात कडधान्यांचे उत्पादन हे घटले आहे. मात्र, खरीप हंगामात चांगली स्थिती आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन विक्रमी होईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा-सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात