महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एनईएफटीची सेवा १६ डिसेंबरपासून २४X७ - आरबीआयचा निर्णय - National Electronic Funds Transfer

एनईएफटीची सुविधा ही १६ डिसेंबरपासून सुट्ट्यांसह ३६५ दिवस सुरू असणार आहे. याबाबत आरबीआयने अध्यादेश काढले आहेत. सध्या एनईएफटीची सुविधा ही केवळ बँकांच्या कामकाजाच्या वेळेत सुरू आहे.

NEFT system
एनईएफटी

By

Published : Dec 7, 2019, 12:18 PM IST

मुंबई- तुम्ही पैसे पाठविण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरचा (एनईएफटी) वापर करत असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एनईएफटी १६ डिसेंबरपासून २४X७ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एनईएफटीची सुविधा ही १६ डिसेंबरपासून ३६५ दिवस सुरू राहणार आहे. याबाबत आरबीआयने अध्यादेश काढले आहेत. सध्या एनईएफटीची सुविधा ही केवळ बँकांच्या कामकाजाच्या वेळेत सुरू आहे. येत्या १६ डिसेंबरनंतर ही बँकांच्या कामकाजानंतर सुविधा स्वयंचलित पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यासाठी बँकांकडून स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंगचा (एसटीपी) वापर करण्यात येणार आहे.

हेही वाचा-ई-कॉमर्स कंपन्यांना वार्षिक अहवाल सादर करणे बंधनकारक; केंद्र सरकारचे आदेश

काय आहे एनईएफटी
नॅशनल ईलेक्ट्रॉनिक फंडमधून (एनईएफटी) केवळ २ लाख रुपयापर्यंत रक्कम पाठविता येते. रोकडविरहित अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी आरबीआयने आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएसचे शुल्क माफ करण्याचे बँकांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे बँकांनी हे शुल्क माफ केले आहे.

संबंधित बातमी वाचा-बँकेच्या आरटीजीएस आणि एनईएफटी प्रणालीतून पैसे पाठविणे आजपासून स्वस्त

ABOUT THE AUTHOR

...view details