मुंबई – कार्डद्वारे होणाऱ्या ऑफलाइन देयक व्यवहाराला आरबीआयने प्रायोगिकतत्वावर परवानगी दिली आहे. इंटरनेट नसलेल्या ठिकाणीही डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
आरबीआयकडून ऑफलाइन देयक व्यवहार यंत्रणा विकसित करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे कमी मूल्य असलेले देयक व्यवहार हे ऑफलाइन अशा कार्ड व मोबाईल डिव्हाईसमधून देण्याची परवानगी प्रायोगिकतत्वार देण्याचा प्रस्ताव असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांचे हितसंरक्षण आणि आर्थिक व्यवहाराची जबाबदारीही स्वीकारली जाणार आहे. ही माहिती आरबीआयने ‘धोरणांचा विकास आणि नियमनात’ जाहीर केली आहे.