नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन चालू बँक खाते काढण्यावर काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामागे बाजारामध्ये वित्तीय शिस्त राहावी आणि निधी इतर वळू नये, हा हेतू आहे.
नवीन चालू खाते काढण्याकरता आरबीआयचे कडक नियम - banking sector in India
कर्जदाराकडून चालू खात्यांसह ओव्हरड्राफ्टच्या खात्यांचा वापर करण्यात येतो. विविध बँकांकडे पुरेसा वित्तपुरवठा असावा, याकरता बँकेकडून नवीन खाते व ओव्हरड्राफ्टच्या सुविधेवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत.
संग्रहित

ज्या ग्राहकांकडे कॅश क्रेडिट अथवा ओव्हरड्राफ्टची सुविधा आहे, त्या ग्राहकांना चालू बँक खाते काढता येणार नाही. याविषयी आरबीआयने बँकांना निर्देश दिले आहेत. जे चालू खाते तीन महिन्यांपासून आहेत, त्यांच्यासाठीही हा नियम लागू असणार आहे.