महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सिटी बँकेला आरबीआयचा दणका; नियमपालनात कुचराई केल्याने ४ कोटींचा दंड - Reserve bank of India rules

आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने केंद्रीय मध्यवर्ती बँकेने दंड ठोठावला आहे. मात्र, त्याचा कोणत्याही व्यवहाराशी व बँकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेशी संबंध नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक
भारतीय रिझर्व्ह बँक

By

Published : May 30, 2020, 11:32 AM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने सिटी बँकेला ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.

सिटी बँकेने ग्राहकांना मिळणाऱ्या क्रेडिट कार्डसह इतर माहिती आरबीआयला दिली नव्हती. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने केंद्रीय मध्यवर्ती बँकेने दंड ठोठावला आहे. मात्र, त्याचा कोणत्याही व्यवहाराशी व बँकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेशी संबंध नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

हेही वाचा-आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये ४.२ टक्के विकासदर; गेल्या ११ वर्षातील नीचांक

दरम्यान, आरबीआयकडून बँकांना वेळीवेळी माहिती देण्याचे निर्देश देण्यात येतात. त्यामागे पारदर्शकता आणणे हा आरबीआयचा हेतू असतो. तसेच ग्राहकांच्या केवायसीची पूर्तता करणे बँकांना बंधनकारक असते. जर ही माहिती दिली नाही, तर आरबीआयकडून बँकांना दंड ठोठावण्यात येतो.

हेही वाचा-चिंताजनक! आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये वित्तीय तुटीत वाढ; ४.६ टक्क्यांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details