नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण समितीचा आकृतीबंध बदलण्याबाबत पुनरावलोकन करण्यात येत आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. जर आवश्यकता भासली तर सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दास म्हणाले, पतधोरण समितीच्या आकृतीबंधाचे (फ्रेमवर्क) काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या आकृतीबंधाचे अंतर्गत पुनरावलोकन आणि परीक्षण करत आहोत. योग्य वेळी, त्याबाबत आवश्यकता भासली तर सरकारसोबत चर्चा करणार आहोत.