मुंबई-कोरोनाच्या महामारीत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात आणि चलनाची तरलता वाढविण्याचे निर्णय घेतले आहेत. असे असले तरी एप्रिल ते सप्टेंबरमध्ये कर्जाचे प्रमाण कमी झाल्याची माहिती आरबीआयच्या अहवालामधून समोर आली आहे.
आरबीआयने ऑक्टोबर २०२० हा पतधोरण अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार महामारीमुळे पहिल्या सहामाहीत कर्ज घेण्याचे प्रमाण आणि कर्जाची मागणी कमी झाली आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक बँकांकडून वितरीत करण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले आहे.