मुंबई -भारतीय रिझर्व्ह बँकेने नवे प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट (पीपीआयएस) आणण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना वस्तू आणि सेवांचे १० हजार रुपयापर्यंतचे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे. याबाबतची आरबीआयने पतधोरण जाहीर करताना घोषणा केली.
प्रिपेड कार्ड हे डिजिटल आर्थिक व्यवहाराला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. नव्या प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट कार्डमुळे आणखी सुविधा मिळणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या प्रिपेड कार्डवर केवळ बँक खात्यामधून रक्कम भरणे शक्य होणार आहे. त्याचा विविध बिल आणि वस्तू खरेदीसाठी वापर करणे शक्य होणार आहे. याशिवाय वित्तीय सेवांसाठीही प्रिपेड कार्डचा वापर करता येणार आहे. प्रिपेड कार्डबाबत ३१ डिसेंबर २०१९ ला अधिक सूचना काढण्यात येतील, असे आरबीआयने म्हटले आहे.