महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अंध व्यक्तींना खऱ्या नोटा ओळखणे होणार सोपे, आरबीआय आणणार खास अॅप

अंध व्यक्तींना खऱ्या नोटा सहज ओळखणे शक्य व्हावे, म्हणून आरबीआयने तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक

By

Published : May 12, 2019, 6:42 PM IST

नवी दिल्ली- अंध व्यक्तींना १०० रुपयांहून कमी मुल्यांच्या खऱ्या व खोटा नोटामधील फरक शोधणे कठीण जाते. ही अडचण लक्षात घेवून भारतीय रिझर्व्ह बँक ही अंध व्यक्तींना खऱ्या नोटा सहज ओळखू शकेल असे अॅप उपलब्ध करून देणार आहे.

सध्या १०० किंवा त्याहून अधिक मुल्यांच्या नोटांचे इंटॅलिगो प्रिंटिग केले जाते. त्यामुळे या खऱ्या नोटा अंधव्यक्तींना ओळखणे सहज शक्य होते. मात्र त्याहून कमी मुल्यांच्या नोटा ओळखता अंध व्यक्तींना त्रासाला सामोरे जावे लागते. अंध व्यक्तींना खऱ्या नोटा सहज ओळखणे शक्य व्हावे, म्हणून आरबीआयने तंत्रज्ञान पुरविणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.


अॅपसाठी कंपन्यांकडून मागविण्यात आल्या निविदा-
कंपन्यांनी तयार केलेल्या मोबाईल अॅपमधून महात्मा गांधी श्रेणीच्या जुन्या व नव्या नोटा ओळखणे शक्य व्हावे, अशी आरबीआयची अपेक्षा आहे. जेव्हा नोट ही मोबाईल कॅमेराच्या समोर आणली जाईल, तेव्हा नोटेची सत्यता कळावी, असे आरबीआयने कंपन्याकडून मागविलेल्या निविदेत म्हटले आहे. तसेच या मोबाईल अॅपमध्ये हिंदीसह इंग्रजी भाषेच्या आवाजातून सूचना देणारी सुविधा असावी, असे आरबीआयने निविदेत म्हटले आहे.

देशात सुमारे ८० लाख अंध अथवा अंशत: अंध व्यक्ती आहेत. आरबीआयच्या अॅपमुळे त्यांना फायदा होणार आहे. आरबीआयने जून २०१८ मध्ये अंध व्यक्तींना खऱया नोटा ओळखण्यासाठी मशीन अथवा अॅप देणार असल्याचे जाहीर केले होते. बाजारात १० रुपयांसह २०, ५०, १००, २००, ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आहे. याशिवाय भारत सरकारने जारी केलेली १ रुपयाची नोटही चलनात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details