नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज समाप्त झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत आरबीआयचे पत धोरण जाहिर केले. वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी ग्रोथ रेट 10.5 राहिल असा अंदाज त्यांनी वर्तवला. तसेच रेपो दर हा 4 टक्के राहणार आहे. तर व्याज दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आरबीआयनेने जाहीर केले पत धोरण, व्याज दरामध्ये बदल नाही - आरबीआयचे पत धोरण
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत आरबीआयचे पत धोरण जाहिर केले. वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी ग्रोथ रेट 10.5 राहिल असा अंदाज त्यांनी वर्तवला.
![आरबीआयनेने जाहीर केले पत धोरण, व्याज दरामध्ये बदल नाही शक्तीकांत दास](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10507438-thumbnail-3x2-uy.jpg)
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर ही पतधोरण समितीची पहिली समिक्षा बैठक होती. गेल्या तीन बैठकांमध्ये आरबीआयने व्याज दरांमध्ये बदल केला नव्हता. यावेळी गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवस्था भरारी घेईल, असे सकारात्मक संकेत दिले. येत्या काळात भाजीपालाच्या किंमती स्थिर राहतील, असेही त्यांनी सांगितले.
यंदा जानेवरी ते मार्च दरम्यान महागाई दर हा 5.2 राहू शकतो. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये एफडीआय आणि एफपीआयमध्ये एफपीआयमध्ये गुतुंवणूक वाढली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.