नवी दिल्ली- आयडीबीआय बँकेने बँकेचे नाव बदलण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेला दिला आहे. या प्रस्तावाबाबत आरबीआय प्रतिकूल असल्याचे सुत्राने सांगितले आहे.
आयडीबीआय बँकेने गेल्या महिन्यात बँकेचे नाव एलयआयसी आयडीबीआय बँक अथवा एलआयसी बँक हे ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारतीय जीवनविमा महामंडळाने आयडीबीआय बँकेच्या शेअरची खरेदी केली आहे. आरबीआयशिवाय केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाचीही नावं बदलण्यासाठी परवानगी लागणार आहे.
जानेवारीमध्ये एलआयसीने आयडीबीआय बँकेचा ५१ टक्के हिस्सा घेतला आहे. यामुळे एलआयसीने बँकिंग क्षेत्रात प्रवेश घेतला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने एलआयसीला आयडीबीआय बँकेचे प्रमोटर म्हणून मान्यता दिली आहे. २०१८ मधील तिसऱ्या तिमाहीदरम्यान आयडीबीआय बँकेचा ४ हजार १८५.४८ कोटींचा तोटा झाला आहे. २०१७ मध्ये तिसऱ्या तिमाहीदरम्यान आयडीबीआय बँकेला १ हजार ५२४.३१ कोटींचा तोटा झाला होता.
===========================================
New Delhi - The IDBI Bank's proposal for changing its name has not found any favour from the Reserve Bank of India, sources said.
The board of IDBI Bank last month proposed change in the name of the lender to either LIC IDBI Bank or LIC Bank, following its takeover by Life Insurance Corporation.
According to the sources, the RBI is not in favour of changing the name of IDBI Bank.
The board had proposed LIC IDBI Bank Ltd as the first preference followed by LIC Bank Ltd.