नवी दिल्ली - आरबीआय ४ एप्रिलला पतधोरण जाहीर करताना रेपो दरात २५ बेसिस पाँईट कमी करेल, अशी शक्यता आहे. जगभरात मंदीची व्यक्त करण्यात येणारी भीती आणि आर्थिक चालना देण्यासाठी आरबीआय रेपो दरात हा बदल करेल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.
आरबीआय ४ एप्रिलपासून रेपो दरात २५ बेसिस पाँईट कमी करण्याची शक्यता
आरबीआयने १८ महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी केले. सलग दुसऱ्यांदा व्याजदर कमी केल्यास निवडणुकीच्या तोंडावर कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरबीआयने १८ महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी केले. सलग दुसऱ्यांदा व्याजदर कमी केल्यास निवडणुकीच्या तोंडावर कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणारआहे. आरबीआयच्या पतधोरण समितीत सहा सदस्य आहेत. या समितीचे अध्यक्ष गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस बैठक चालणार आहे. ही समिती ४ एप्रिलला पतधोरण जाहीर करणार आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मधील ही पहिली बैठक असणार आहे.
स्थानिक आणि जागतिक पातळीवरील मुद्दे आरबीआयचे पतधोरण निश्चित करताना प्रभाव टाकतील, असे कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (कन्झम्युअर बँकिंग) पीएफबी शांती एकांबरम यांनी सांगितले. आरबीआय रेपो दराचे २५ बेसिस पाँईट कमी करण्याची शक्यता आहे. मात्र महागाई आणि आर्थिक विकासदर या आकडेवारीवरून हा निर्णय आरबीआय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय निवडणुकीनंतर केंद्र सरकारकडून सादर करण्यात येणाराअर्थसंकल्प, मान्सून आणि तेलाच्या किंमतीचाही आरबीआय विचार करेल, असे एकांबरम यांनी म्हटले आहे.