मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारासाठी प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट (पीपीआयए) कार्ड आणले आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना वस्तू आणि सेवांचे १० हजार रुपयापर्यंतचे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार आहे.
पीपीआय हे कार्ड केवळ बँक खात्याशी संलग्न करता येते. यापूर्वीच्या पतधोरणात आरबीआयने पीपीआय कार्ड लाँच करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. नव्या प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट कार्डमुळे आणखी सुविधा मिळणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.