महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आरबीआयकडून बजाज फायनान्सला २.५ कोटींचा दंड - RBI fine due to recovery agents

बजाज फायनान्सकडून कर्ज वसुली करताना नियमभंग होत असल्याचे आरबीआयकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. नियमांचे पालन करताना त्रुटी राहत असल्याने आरबीआयने कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे.

बजाज फायनान्स
बजाज फायनान्स

By

Published : Jan 5, 2021, 9:03 PM IST

Updated : Jan 5, 2021, 10:20 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने २.५० कोटी रुपयांचा दंड बजाज फायनान्सला दंड ठोठावला आहे. कर्ज वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियमभंग केल्याने हा दंड ठोठावल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात येते. या एजन्सीकडून नेमलेले एजंट हे कर्जदारांकडून कर्ज वसुली करतात. अशा कर्ज वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचा छळ करू नये, असे आदेश यापूर्वीच आरबीआयने दिले आहेत. मात्र, बजाज फायनान्सकडून कर्ज वसुली करताना नियमभंग होत असल्याचे आरबीआयकडे सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. नियमांचे पालन करताना त्रुटी राहत असल्याने आरबीआयने कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, त्याचा कंपनीच्या व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले.

दरम्यान, बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने थकीत कर्जदारास दुचाकीचा हप्ता न भरल्याने बेल्टने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार ऑक्टोबर २०२० मध्ये समोर आला होता.

हेही वाचा-'बजाज फायनान्स'ला मनसेचा दणका, १ लाख १९ हजार ७४३ रिक्षामालकांना आर्थिक दिलासा

लॉकडाऊन नंतर फायनान्स व बचतगटवाल्यांचा थकीत हप्त्यासाठी तगादा

टाळेबंदी व कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग डबघाईला आले आहेत. नोकऱ्यांमधील कपातीने अनेक नागरिकांची कर्जे थकीत झाले आहेत. परंतु फायनान्स कंपन्यांनी वसुली करताना कर्जदारांना कठोर वागणूक दिल्याचे प्रकार समोर आले होते.

हेही वाचा-बजाज फायनान्सची गुंडगिरी; थकीत कर्जदारास बेल्टने मारहाण

बजाज फायनान्सविरोधात मनसेने केले होते आंदोलन-

टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे राज्यातील रिक्षा मालकांना पाच महिने कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. अशा स्थितीत रिक्षासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडून रिक्षा मालकांवर दबाव टाकला जात होता. अशा आशयाच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडे आल्या होत्या. त्यानंतर मनसेने आंदोलन केल्यानंतर बजाज फायनान्सने रिक्षा मालकांचे दंड माफ केले होते.

Last Updated : Jan 5, 2021, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details