महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पत निर्धारित करणाऱ्या संस्थांबरोबर बैठक - अर्थकारण बातम्या

आरबीआय गव्हर्नर दास यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्यवस्थापकीय संचालक आणि पत रेटिंग एजन्सी (सीआरए) चे मुख्य अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला डेप्युटी गव्हर्नर आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

गव्हर्नर शक्तिकांत दास
गव्हर्नर शक्तिकांत दास

By

Published : Jun 11, 2020, 5:20 PM IST

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी पत निर्धारित करणाऱ्या संस्थांनी एकंदरित आर्थिक स्थितीचे केलेले मूल्यांकन आणि त्यांचा आर्थिक क्षेत्रासह विविध उद्योगांबद्दलचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. या संदर्भातील माहिती संबंधित संस्थांकडून मागवली आहे, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

आरबीआय गव्हर्नर दास यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्यवस्थापकीय संचालक आणि पत रेटिंग एजन्सी (सीआरए) चे मुख्य अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला डेप्युटी गव्हर्नर आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत अन्य बाबींबरोबरच एजन्सींच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन आणि वित्तीय क्षेत्रांसह एजन्सींचा त्यांच्याविषयीचा दृष्टीकोन यावर चर्चा झाली. सीआरएने रेट केलेल्या संस्थांचे एकूण आर्थिक गणित आणि सध्याच्या संदर्भात पत रेटिंगवर परिणाम करणारे मुख्य घटक यावर आधारित इतर चर्चेत असलेल्या विषयांवर चर्चा झाली. रेटिंग प्रक्रिया अधिक बळकट करण्याच्या मार्गांवर आणि मुख्य भागधारकांशी असलेल्या गुंतवणूकीबाबत आरबीआयने अभिप्राय मागवला असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details