मुंबई - ग्राहकांची खाती काढताना केवायसी फॉर्मच्या नियमांचे पालन न करणे सरकारी बँकांना चांगलेच महागात पडले आहे. केवायसीत हलगर्जीपणा केल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने चार सरकारी बँकांना १.७५ कोटींचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयचा दणका, 'या' कारणाने सरकारी बँकांना १.७५ कोटीचा दंड - alahabad bank
आरबीआयने पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक आणि युको बँकेला प्रत्येकी ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. तर कॉर्पोरेशन बँकेला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआय
पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक आणि युको बँकेला प्रत्येकी ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. तर कॉर्पोरेशन बँकेला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
केवायसी म्हणजे तुमचा ग्राहक कोण ? या नियमाप्रमाणे खातेदाराची सर्व माहिती बँकांना देणे आवश्यक आहे. बेनामी संपत्तीला आळा घालणे, दहशतवाद्यांना पुरविण्यात येणारा आर्थिक मदत थांबविणे अशी बेकायदेशीर कृत्यांना चाप लावणे असा केवायसीचा हेतू आहे. केवळ कामातील कमतरतेमुळे हा दंड ठोठावला असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.