मुंबई - मंदावलेली अर्थव्यवस्था आणि कमी मागणी या दोन्ही बाबींमुळे देशाचा जीडीपी पूर्वीच्या अंदाजाहून कमी राहील, असे आरबीआय पतधोरण समितीने म्हटले आहे. चालू वर्षात जीडीपी ६.९ टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. यापूर्वी जूनच्या तिमाहीत पतधोरण समितीने जीडीपी ७ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील पहिल्या तिमाहीत जीडीपी हा ७.४ टक्के राहिल, असे आरबीआयच्या पतधोरण समितीने म्हटले आहे. अनेक निर्देशांकाच्या वारंवारतेमधून मागणी कमी होणार असल्याचे सूचित होत आहे, असे पतधोरण समितीने म्हटले आहे. मात्र, फेब्रुवारी २०१९ नंतर घेतलेल्या धोरणाने आर्थिक प्रक्रियांना गती मिळेल, अशी अपेक्षा पतधोरण समितीने व्यक्त केली आहे.
चालू आर्थिक वर्षात जीडीपी ७ नव्हे ६.९ टक्के राहिल, आरबीआयकडून अंदाजात बदल
अनेक निर्देशांकाच्या वारंवारतेमधून मागणी कमी होणार असल्याचे सूचित होत आहे, असे पतधोरण समितीने म्हटले आहे. मात्र फेब्रुवारी २०१९ नंतर घेतलेल्या धोरणाने आर्थिक प्रक्रियांना गती मिळेल, अशी अपेक्षा पतधोरण समितीने व्यक्त केली आहे.
पतधोरण समिती
चालू वर्षातील तिसरी पतधोरण समितीचे धोरण आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केले आहे. या धोरणामध्ये त्यांनी सलग चौथ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. आरबीआयचे रेपो दर ०.३५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.