महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 22, 2021, 7:54 PM IST

ETV Bharat / business

भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द

बँक अवसायानात निघाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला डीआयजीसी कायदा 1961 प्रमाणे 5 लाखापर्यंतची रक्कम मिळते. परवाना रद्द झाल्याने भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वरूड या बँकेचे कामकाज हे गुरुवारपासून बंद होणार आहे.

RBI
भारतीय रिझर्व्ह बँक

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने अमरावतीमधील भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.

भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 98 टक्के ठेवीदारांना डीआयजीसीच्या विम्याप्रमाणे पूर्णपणे ठेव मिळणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँक अवसायानात निघाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला डीआयजीसी कायदा 1961 प्रमाणे 5 लाखापर्यंतची रक्कम मिळते. परवाना रद्द झाल्याने भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वरूड या बँकेचे कामकाज हे गुरुवारपासून बंद होणार आहे.

हेही वाचा-ओला जुलैमध्ये ई-स्कूटर करणार लाँच; 400 शहरांत 1 लाख चार्जिंग पॉईंटचे उद्दिष्ट

बँकिंग परवाना रद्द करण्यामागे हे आरबीआयने दिले कारण-

बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच उत्पन्न मिळविण्याचे भविष्य दिसत नसल्याने आरबीआयने भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत असल्याचे कारण दिले आहे. तसेच बँकेकडून बँकिंग नियमन कायदा, १९४९ चे पालन होत नसल्याचेही आरबीआयने म्हटले आहे. ठेवीदारांची संपूर्ण रक्कम देण्याची बँकेची सध्याची आर्थिक स्थिती नाही. ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. जर बँकेला कामकाज सुरू करण्याची परवानगी दिली तर त्यामुळे लोकांचे नुकसान होऊ शकते, असेही आरबीआयने आदेशात म्हटले आहे.

सहकार आयुक्त आणि सहकारी सोसायटी निबंधकांना भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अवसायानात काढण्यासाठीही आरबीआयने आदेश दिले आहेत.

हेही वाचा-कोव्हिशिल्डच्या उत्पादनाकरिता सीरमने बँकांकडून घेतले कर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details