मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने कानपूर येथील पीपल्स को-ऑपरटिव्ह बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधांमुळे या बँकेला सहा महिने नवीन कर्ज मंजूर करता येणार नाहीत. तसेच सहा महिने नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे 'या' सहकारी बँकेवर निर्बंध; ठेवीदारांचे अडकले पैसे - Banking issue in India
कानपूर येथील पीपल्स को-ऑपरटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. या बँकेच्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढता येणार नाही.
कानपूर येथील पीपल्स को-ऑपरटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. या बँकेच्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढता येणार नाही. आरबीआयने आदेशात म्हटले की, 10 जूनपुढे पीपल्स को-ऑपरटिव्ह बँकेला कोणतेही नवीन कर्ज अथवा जुन्या कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही.
या सहकारी बँकेला मालमत्तेची विक्री, मालमत्तेचे हस्तांतरण करता येणार नाही. हे आदेश सहा महिन्यांपर्यंत लागू असणार आहे. या आदेशाचे वेळोवेळी अवलोकन करण्यात येणार आहे. असे असले तरी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना सुरू राहणार असल्याचे बँकेने आदेशात नमूद केले आहेत. गतवर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरटिव्हवर अशीच कारवाई केली होती.