नवी दिल्ली- एचडीएफसी बँकेच्या डिजीटल सेवा सातत्याने विस्कळित असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयटीच्या पायाभूत सुविधांचे विशेष लेखापरीक्षण आरबीआयकडून केले जाणार आहे. त्यासाठी आरबीआयने स्वतंत्र आयटी कंपनीची नियुक्ती केली आहे.
बँकिंग नियमन कायद्यांतर्गत एचडीएफसीच्या संपूर्ण आयटीच्या पायाभूत सुविधांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. एचडीएफसी बँकेला लेखापरीक्षण करणाऱ्या आयटी कंपनीला संपूर्ण सहकार्य करावे लागणार आहे. ही माहिती एचडीएफसी बँकेने शेअर बाजाराला दिली आहे.
हेही वाचा-Budget 2021 : प्राप्तीकर मर्यादा जैसे थे, विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी खैरात
गेल्या महिन्यात एचडीएफसी बँकेने संपूर्ण कार्यवाही करण्याचे नियोजन आरबीआयला दिले आहेत. एचडीएफसीच्या सेवांमध्ये सतत अडथळे येत असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होती. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने एचडीएफसीच्या पायाभूत सेवांचे लेखापरीक्षणाचे आदेश दिले आहेत. या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाटी १० ते १२ आठवडे लागणार असल्याचे एचडीएफसीने म्हटले होते.
हेही वाचा-अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी कायम; गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची वाढ
एचएफडीसीवर नवे कार्ड काढण्यावर आरबीआयने लादले आहेत निर्बंध
लेखीपरीक्षण झाल्यानंतर आरबीआयकडून एचडीएफसीवरील डिजीटल नवीन कार्ड काढण्यावरील निर्बंध हटविण्यात येण्याची शक्यता आहे. आरबीआयने डिसेंबरमध्ये एचडीएफसीला नवीन डिजीटल उपक्रम अथवा क्रेडिट काढण्यावर निर्बंध लागू केले आहेत. कारण, दोन वर्षांपासून बँकेच्या डिजीटल सेवांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. सप्टेंबर २०२० च्या आकडेवारीनुसार एचडीएफसीचे देशात क्रेडिट कार्डचे सर्वाधिक १.४९ कोटी ग्राहक आहेत.