मुंबई- खऱ्या-खोट्या नोटांमधील फरक ओळखणे, हे दृष्टीहीनांसाठी अधिक सोपे होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दृष्टीहीनांना उपयुक्त ठरणाऱ्या अॅपचे आज लाँचिंग केले आहे.
दृष्टीहीनांचे अॅप मनी (मोबाईल एडेड नोट आयडिन्टीफायर) म्हणून ओळखले जाते. हे अॅप अँड्राईड आणि आयओएस अॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. या अॅपमध्ये विविध भाषा आहेत. तसेच दृष्टीहीनांना मौखिक सूचना देत अॅपचा वापर करता येतो.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हेही वाचा-मारुती सुझुकीसह महिंद्राच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये वाढ
चलनातील महात्मा गांधी श्रेणीच्या नव्या व जुन्या नोटा ओळखण्यासाठी हे मनी अॅप उपयुक्त आहे. हे अॅप चालू करून कॅमेरा नोटांवर आणला असताना येणाऱ्या ध्वनीमुळे खऱ्या नोटेची ओळख पटते. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी लागू केल्यानंतर १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर महात्मा गांधींच्या नव्या श्रेणीत लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षात नव्या श्रेणीत १०, २०, ५०, १००, २००,५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या आहेत.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास हेही वाचा-वर्षाचा पहिला दिवस: निर्देशांक वधारून मुंबई शेअर बाजारासह निफ्टी बंद